पुणे जिल्हा | शेलपिंपळगाव केसरीची मानकरी ठरली सोनीका हुड्डा

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे रंगलेल्या शेलपिंपळगाव केसरी महिलाचा मान सोनीका हुड्डा हिने सिद्धी होळकरचा पराभव करीत पटकावला असून चांदीची गदा व एक लाख 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. कुस्तीपटू अनन्या बापूसाहेब थिटे हिच्या वाढदिवसानिमित्त शेलपिंपळगाव केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून 100 पेक्षा अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला होता. यास्पर्धेसाठी सात हजार रुपयांपासून एक लाख 11 हजार 111 रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र केसरी विकी बनकर, वस्ताद अमोल तेरावे, आयोजक राजगुरू केसरी बाप्पुसाहेब थिटे, राजकुमार राऊत, धनंजय पठारे, चैताली थिटे, महाराष्ट्र पोलीस ज्ञानेश्वरी थिटे, दीपाली थिटे उपस्थित होत. भव्य महिला कुस्त्यांचे आयोजन शेलपिंपळगाव ग्रामस्थ आणि बापूसाहेब थिटे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.





