IPL 2026 Playoffs Schedule : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक जाहीर! फायनल सामन्याचे ठिकाण बदलले; आता ‘या’ शहरात होणार
IPL 2026 Playoffs Schedule : यावर्षी बीसीसीआयने प्लेऑफच्या सामन्यांसाठी नवीन आणि महत्त्वाच्या केंद्रांची निवड केली आहे.

IPL 2026 Playoffs Schedule Announce : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ६ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या घोषणेतील सर्वात मोठी बातमी म्हणजे, या मोसमाचा अंतिम सामना (Final) आता बंगळुरूऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बंगळुरूहून अंतिम सामना का हलवला? (IPL 2026 Playoffs Schedule)
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अंतिम सामन्याचे आयोजन बंगळुरू येथे होणार होते. मात्र, स्थानिक क्रिकेट असोसिएशनच्या काही मागण्या बीसीसीआयच्या नियमांनुसार आणि प्रोटोकॉलच्या बाहेर होत्या. याशिवाय, ऑपरेशनल आणि लॉजिस्टिकल अडचणींमुळे हा सामना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या मते, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर या भव्य स्पर्धेची सांगता करणे अधिक आकर्षक ठरेल.
धर्मशाला आणि न्यू चंदीगडला मोठी जबाबदारी –
🚨 News 🚨
BCCI Announces #TATAIPL 2026 Playoffs Schedule
Qualifier 1: Dharamshala
Eliminator and Qualifier 2: New Chandigarh
Narendra Modi Stadium, Ahmedabad to Host Grand Finale 🏟️
More Details ▶️ https://t.co/32HvsabiuF#KhelBindaas pic.twitter.com/ItrNUNoxHZ
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026
यावर्षी बीसीसीआयने प्लेऑफच्या सामन्यांसाठी नवीन आणि महत्त्वाच्या केंद्रांची निवड केली आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर २६ मे रोजी पहिला सामना खेळवला जाईल. तसेच, न्यू चंदीगडच्या न्यू इंटरनॅशनल स्टेडियमवर एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ च्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच न्यू चंदीगडसारख्या नव्या केंद्राला प्लेऑफसारख्या महत्त्वाच्या सामन्यांची जबाबदारी मिळाली आहे. (IPL 2026 Playoffs Schedule)
आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक –
| सामन्याचे नाव | तारीख | ठिकाण |
| क्वालिफायर १ | २६ मे २०२६ | धर्मशाला |
| एलिमिनेटर | २७ मे २०२६ | न्यू चंदीगड |
| क्वालिफायर २ | २९ मे २०२६ | न्यू चंदीगड |
| अंतिम सामना (Final) | ३१ मे २०२६ | अहमदाबाद |
प्लेऑफ्ससाठी चुरशीची लढत –
लीग टप्प्यातील ७० सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल चार स्थानांवर राहणाऱ्या संघांमध्ये ही अंतिम लढत होणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार चेन्नई सुपर किंग्स आणि इतर संघ अव्वल स्थानी राहण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. तर, दिल्लीच्या संघासाठी पुढील वाटचाल कठीण असून प्रशिक्षक हेमांग बदानी यांच्या मते आता प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असाच असणार आहे.





