बुमराह-शमीचे पर्याय शोधण्यात BCCI व्यस्त, वेगवान गोलंदाजांसाठी खास शिबिराचे केले आयोजन, पाहा VIDEO

शिबिरात 14 लक्ष्यित आणि 8 अंडर-19 गोलंदाज –
बीसीसीआयने रविवारी ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये 22 निवडक आणि अंडर-19 वेगवान गोलंदाज बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलन्स येथे प्रशिक्षण घेताना दिसले. हे गोलंदाज बीसीसीआयचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक ट्रॉय कूली यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस, गोलंदाजी तंत्र आणि रणनीती यावर काम करत आहेत. यापैकी 14 गोलंदाजांवर बीसीसीआय विशेष लक्ष ठेवून आहे, तर 8 गोलंदाज अंडर-19 गटातील आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाजीची प्रगती –
At the BCCI Centre of Excellence, fourteen Targeted and eight Under-19 fast bowlers took part in the Fast Bowling Development program which has been a key initiative in the last few years 🙌
In addition to the players going through fitness evaluations, they also worked on skill… pic.twitter.com/3HlQhSEu5u
— BCCI (@BCCI) August 17, 2025
गेल्या काही दशकांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीने लक्षणीय प्रगती केली आहे. विशेषतः रवि शास्त्री आणि भरत अरुण यांच्या प्रशिक्षणादरम्यान, तत्कालीन कर्णधार विराट कोहली यांच्या योगदानामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. नुकत्याच झालेल्या इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर करंडक स्पर्धेदरम्यान आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या दुखापतीमुळे अंशुल कंबोजला संघात स्थान देण्यात आले. मात्र, हरियाणाच्या या गोलंदाजाचे पदार्पण खास ठरले नाही.
हेही वाचा – Yuvraj Singh Sister : युवीच्या बहिणीची भारतीय संघात निवड! कोण आहे एमी ऊर्फ अमरजोत? जाणून घ्या
शिबिरातील प्रमुख खेळाडू –
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण करणारे हर्षित राणा आणि अंशुल कंबोज यांच्यासह सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, सूर्यांश शेडगे, गुरजपनीत सिंह आणि युद्धवीर सिंह चरक यांसारखे युवा गोलंदाज दिसले. याशिवाय, सुयश शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली, ज्यामुळे हे खेळाडू आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येते.
हेही वाचा – Babar Azam : ‘…म्हणून बाबरला संघातून वगळलं’, पाकिस्तान संघाच्या कोचने सांगितलं खरं कारण, पाहा VIDEO
भविष्यासाठी बीसीसीआयची तयारी –
या शिबिरामुळे बीसीसीआयला जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांसारख्या गोलंदाजांचे पर्याय तयार करण्याची अपेक्षा आहे. विशेषतः बुमराहसारख्या खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही पावले महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. या शिबिरातून आगामी हंगामासाठी गोलंदाजांना तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.





