IND vs ENG : बीसीसीआयने ऋषभ पंतबद्दल दिली मोठी अपडेट, गरज पडल्यास तो फलंदाजी करेल पण…

BCCI give update about Rishabh Pant injury : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतबाबत बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की, ऋषभ पंत या सामन्यात विकेटकीपिंग करणार नाही, परंतु गरज पडल्यास तो फलंदाजी करण्यासाठी उपलब्ध असेल. ऋषभ पंत पायाला पट्टी बांधून ओल्ड ट्रॅफर्ड येथे संघासोबत सामील झाला आहे.
बीसीसीआयने ऋषभ पंतबद्दल काय दिली अपडेट?
पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत फलंदाजी करताना जखमी झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने म्हटले की, ध्रुव जुरेल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळेल, ज्याप्रमाणे त्याने मागील सामन्यात लॉर्ड्स येथे केले होते. दुखापतीनंतरही, ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी संघात सामील झाला असून, संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करण्यासाठी उपलब्ध आहे.
ध्रुव जुरेल पंतच्या जागी विकेटकीपिंग करणार –
𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲: Rishabh Pant, who sustained an injury to his right foot on Day 1 of the Manchester Test, will not be performing wicket-keeping duties for the remainder of the match. Dhruv Jurel will assume the role of wicket-keeper.
Despite his injury, Rishabh Pant has joined the…
— BCCI (@BCCI) July 24, 2025
पंतला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पायाच्या बोटाला फ्रॅक्टर झाले होते. त्यामुळे तो त्या दिवशी पुढे खेळू शकला नाही. ही अपडेट अशा वेळी आली आहे, जेव्हा काही अहवालांमध्ये म्हटले होते की तो पुन्हा फलंदाजी करू शकणार नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी त्याला 6 आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातून (द ओव्हल) बाहेर पडेल.
तथापि, काही इतर अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, पंतने संघाला सांगितले आहे की, गरज पडल्यास तो वेदनाशामक औषधे घेऊन खेळण्यास तयार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेही यावर कदाचित सहमती आहे. त्यामुळे बीसीसीआयने पंतच्या फलंदाजीबाबत अपडेट दिली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ध्रुव जुरेलला पंतच्या जागी फलंदाजी करता येणार का? काय आहे आयसीसीचा नियम? जाणून घ्या
आयसीसीच्या नियमांनुसार, जखमी खेळाडूच्या जागी दुसरा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही, जोपर्यंत त्याच्या डोक्याला दुखापत झालेली नसेल. त्यामुळे जुरेल विकेटकीपिंग करू शकतो, परंतु पंतच्या जागी फलंदाजी करू शकत नाही. पंतसोबत अशा प्रकारे दोन सामन्यांमध्ये दोन वेळा घडले आहे. मागील सामन्यात पंतला विकेटकीपिंग करताना दुखापत झाली होती, तर या सामन्यात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली आहे.





