Indian Womens Cricket : BCCI ने जाहीर केला केंद्रीय करार, अव्वल श्रेणीत फक्त ‘या’ ३ खेळाडूंना मिळाले स्थान

BCCI announce annual central contract for Indian women team : बीसीसीआयने सोमवारी भारतीय महिला क्रिकेट संघाचा २०२४-२५ हंगामासाठी (१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५) केंद्रीय करार जाहीर केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे, कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांचा पुन्हा एकदा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच पाच खेळाडूंचा पहिल्यांदाच केंद्रीय करार समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सहा खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयचा महिला संघाचा केंद्रीय करार जाहीर-
सोमवारी बीसीसीआयने केंद्रीय करारात कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना ग्रेड ‘ए’ मध्ये स्थान दिले आहे. या खेळाडूंना दरमहा ५० लाख रुपये मिळतील. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग, अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्ज, यष्टीरक्षक रिचा घोष आणि सलामीवीर शफाली वर्मा यांना ग्रेड ‘बी’ मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यांना ३० लाख रुपये मिळतील.
या पाच नवीन चेहऱ्यांना केंद्रीय करारात मिळाले स्थान-
🚨 News 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Women)#TeamIndia pic.twitter.com/fwDpLlm1mT
— BCCI Women (@BCCIWomen) March 24, 2025
युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटील, वेगवान गोलंदाज तितस साधू आणि अरुंधती रेड्डी, अष्टपैलू अमनजोत कौर आणि यष्टीरक्षक उमा छेत्री यांना पहिल्यांदाच केंद्रीय करारात सामील करुण घेण्यात आले आहे. त्यांना ‘सी’ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये यास्तिका भाटिया, राधा यादव, स्नेहा राणा आणि पूजा वस्त्रकर यांचाही समावेश आहे. या खेळाडूंना दरवर्षी १० लाख रुपये मिळतील. केंद्रीय कराराव्यतिरिक्त, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी पैसे देखील मिळतात.
हेही वाचा – CSK vs MI : एमएस धोनीने मुंबईविरुद्धच्या विजयानंतर दीपक चहरला मारली बॅट, VIDEO होतोय व्हायरल
प्रत्येक सामन्यासाठी कसोटी शुल्क १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये दिले जातात. भारतीय महिला क्रिकेट संघासमोर यावर्षी मोठे आव्हान आहे. या आव्हानाचे नाव एकदिवसीय विश्वचषक आहे, जे घरच्या मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत जर टीम इंडियाने जेतेपद पटकावले, तर भविष्यात या खेळाडूंवर बीसीसीआय अधिक पैसे खर्च करु शकते.
हेही वाचा – CSK vs MI : विघ्नेश पुथूरच्या फिरकीची धोनीलाही पडली भुरळ, सामन्यानंतर दिली शाब्बासकीची थाप, VIDEO व्हायरल
या सहा खेळाडूंना केंद्रीय करारातून मिळाला डच्चू –
बीसीसीआयने सहा खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. ज्यामध्ये मेघना सिंग, देविका वैद्य, एस मेघना, अंजली सरवानी, हरलीन देओल आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे. अशा प्रकारे महिला संघाचा केंद्रीय करार जाहीर झाला असून लवकरच भारतीय पुरुष क्रिकेट संघाचाही करार केला जाईल. पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंना भरपूर पैसे मिळतात. ग्रेड ए प्लस खेळाडूंना ७ कोटी रुपये, ग्रेड ए खेळाडूंना ५ कोटी रुपये, ग्रेड बी खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि ग्रेड सी खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात.





