BCCI AGM 2025 : विराट -रोहितच्या पगारात कपात? गिलचं काय होणार? बीसीसीआयच्या वार्षिक सभेत होणार मोठा निर्णय

BCCI AGM 2025 : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) ची 31 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक 22 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी सर्वात जास्त चर्चा टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू रोहित आणि विराट कोहली यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची आहे. या दोघांनी मागच्या वर्षी टेस्ट आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे.सध्या ते फक्त वनडे खेळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत दोघांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेडवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विराट–रोहित A+ ग्रेडमधून बाहेर जाणार?
2024–25 कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025), कोहली आणि रोहित A+ वर्गात होते. या वर्गात जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचाही समावेश आहे. अहवालांनुसार BCCI आता दोन्ही खेळाडूंच्या ग्रेडिंगवर पुन्हा विचार करणार आहे. जर ते A+ ग्रेडाबाहेर गेले तर दोन्ही खेळाडूंच्या वार्षिक पगारात २ कोटींची कपात होऊ शकते. सध्या दोन्ही खेळाडू फक्त वनडे फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे A+ वर्गात त्यांचा समावेश राहणे कठीण आहे.
शुभमन गिलला A+ ग्रेड मिळणार?
या बैठकीत सर्वात मोठा फायदा टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार असलेल्या शुभमन गिलला होण्याची दाट शक्यता आहे. गिल सध्या A वर्गात आहेत, परंतु मागील एका वर्षात त्याला टीमची कमान मिळाली आहे. त्याने सर्व फॉर्मॅटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलला A+ ग्रेडमध्ये स्थान मिळू शकते. रवींद्र जडेजा आणि बुमराह हे या ग्रेडमध्ये कायम राहतील.
समितीमध्ये कोणाचा समावेश?
समितीमध्ये मिथुन मनहास (अध्यक्ष), रघुराम भट्ट (कोषाध्यक्ष), देवजीत साइकिया (सचिव), प्रभतेज सिंग भाटिया (संयुक्त सचिव), सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह ( काउन्सलर) यांचा समावेश आहे.





