IND vs NZ 1st Test : पहिल्या कसोटीतून शुभमन गिलला का वगळलं, बीसीसीआयने केला खुलासा…

IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. शुभमन गिल या सामन्याचा भाग नाही. तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत सर्फराज खानला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गिलला वगळण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
नाणेफेकीनंतर बीसीसीआयनं (BCCI) ने एक्स् (X) वर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शुभमन गिलला मानेची दुखापत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. याच कारणामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळत नाहीए. गिलने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. पण पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो बेंगळुरू कसोटीतून बाहेर पडला आहे. गिल तंदुरुस्त राहिल्यास दुसऱ्या कसोटी मालिकेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा निश्चितपणे समावेश होईल.”
Update: Shubman Gill was unavailable for selection of the first Test due to a neck stiffness.
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrs1td#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 17, 2024
सरफराजचा आतापर्यंत देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने टीम इंडियासाठी 3 कसोटी सामनेही खेळले आहेत. सर्फराजने या कालावधीत 200 धावा केल्या आहेत. अलीकडेच त्याने घरच्या सामन्यात नाबाद 222 धावा केल्या. सर्फराजचा फॉर्म पाहता त्याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे.
IND vs NZ 1st Test : शून्यावर बाद होऊनही कोहलीने नोंदवला विक्रम, ‘या’बाबतीत धोनीला टाकले मागे….
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. यासह भारताच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. रिषभ पंत (49) आणि यशस्वी जैस्वाल (13) या दोघांव्यतिरिक्त एकलाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. विराटसह 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. यात युवा खेळाडू सर्फराजचाही समावेश होता. गिलच्या जागी त्याला आज संधी देण्यात आली होती, मात्र तो त्या संधीचं सोनं करू शकला नाही. आता दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वाचं लक्ष्य असणार आहे.





