Pune News : ५ लाखांची लाच घेताना पोलिस हवालादराला रंगेहाथ पकडले; ACB ची धडक कारवाई
Pune News : बारामती ग्रामिण पोलिस ठाण्यातील पोलिस हवालादार महेश अंकुश उगले (वय 36, रा. विजयनगर बारामती) याला पाच लाखांची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.

Pune News : बारामती ग्रामिण पोलिस ठाण्यातील पोलिस हवालादार महेश अंकुश उगले (वय 36, रा. विजयनगर बारामती) याला पाच लाखांची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. यापुर्वी उगले याने कारवाई न करण्यासाठी दोन लाखाची लाच घेतली असून, त्याने सात लाखाच्या लाचेची मागणी केली होती. (Pune News)
याप्रकणी, उगले याच्या विरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. (Pune News)
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी झुंबा डान्स व जीम चालवतात. क्लासमुळे त्रस्त झालेल्या काही लोकांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर कारवाई व्हावी म्हणून पोलिसात तक्रार केली होती. त्याची चौकशी पोलिस हवालदार उगले याच्याकडे देण्यात आली होती. (Pune News)
उगले याने तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. कारवाईच्या धाकाने यापुर्वी त्यातील दोन लाख रुपये घेतले देखील. त्यानंतर पाच लाखासाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे 7 सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. (Pune News)
पडताळणीत उगले हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने मंगळवारी (दि. 8) सापळा लावला होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास उगले याला पीडीसीसी बँकेजवळ माळेगाव रोड येथे पाच लाखांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune News)
ही कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने केली. (Pune News)
Pune News : … अन्यथा ११ सप्टेंबरला राज्यव्यापी कोचिंग क्लासेस बंद!





