Baramati Crime: बारामतीत खळबळ! माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा; २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Baramati Crime: गुणवडी येथील गोपाळकृष्ण हरिहर याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांत फिर्याद; बदनामीची भीती दाखवून २० लाख रुपये मागितल्याचा ठपका.

Baramati Crime – ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याच्या अर्जांपासून 20 लाखांची कथित मागणी केल्याप्रकरणी एकाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोपाळकृष्ण हरिभाऊ हरिहर (रा. गुणवडी, ता. बारामती) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे अर्ज, तक्रारी व पाठपुरावा केला. त्यानंतर त्या प्रक्रियेचा आधार घेत फिर्यादीवर दबाव निर्माण केला, त्यांची बदनामी करण्याची भीती दाखविली.
सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याच्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या. त्यानंतर आर्थिक मागणी केली, असा आरोप केला आहे. तपासादरम्यान संकलित केलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे, व्हिडीओ रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्ट, फॉरेन्सिक प्रमाणपत्रे, साक्षीदारांचे जबाब, इतर उपलब्ध कागदपत्रांच्या प्राथमिक पडताळणीत फिर्यादीकडून 20 लाख रुपयांची मागणी केल्याची दर्शविणारी सामग्री उपलब्ध झाली आहे. उपलब्ध डिजिटल पुराव्यांमध्ये संबंधित संभाषणाचे ध्वनीचित्रण, फॉरेन्सिक परीक्षण अहवाल, ट्रान्सक्रिप्ट, साक्षीदारांनी दिलेली माहिती यांचा समावेश आहे.
बाबींची वैज्ञानिक, तांत्रिक व कायदेशीर पडताळणी सुरू असून त्यासंदर्भात पुढील तपास प्रगतीपथावर आहे. उपलब्ध पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक डेटा व इतर कागदपत्रांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे करीत आहेत.
बारामतीत माहिती अधिकार कार्यकर्ते याने शासकीय अर्ज, तक्रारी, प्रशासकीय कारवाईचा धाक दाखवून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाला का, तसेच पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांच्या जबाबांची सखोल पडताळणी केली आहे. माहितीचा अधिकार हा पारदर्शकता वाढविण्यासाठी नागरिकांना दिलेला एक प्रभावी अधिकार आहे. मात्र, हाच अधिकार सार्वजनिक हिताऐवजी दबाव तंत्र, बदनामी, ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक लाभ मिळविण्याचे साधन म्हणून वापरल्याचे समोर आले आहे.





