Baramati Crime : बारामती हादरली..! गरोदर महिलेच्या घरात घुसून अत्याचार; नंतर निर्घृणपणे हत्या
Baramati Crime : बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी (Pandare MIDC) परिसरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि विकृत मानसिकतेची संतापजनक घटना समोर आली आहे.

Baramati Crime : बारामती तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पणदरे एमआयडीसी परिसरात एका गरोदर महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (Baramati Crime)
या घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मृत महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार असून वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आले आहे. गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे, ता. बारामती) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Baramati Crime)
घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी गणेश माने हा महिलेच्या घरात जबरदस्तीने शिरला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने त्याला विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर हातोड्याने हल्ला केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Baramati Crime)
हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्यानंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार कोणाला समजू नये, या उद्देशाने आरोपीने महिलेचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Baramati Crime)
हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोपही आहे. (Baramati Crime)
वैद्यकीय तपासणीत गंभीर जखमा
महिलेच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणी अहवालातून तिच्या शरीरावर गंभीर दुखापती असल्याचे समोर आले आहे. डोक्यावर आणि मानेवर जखमा आढळल्या असून, वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Baramati Crime)
घटनेचे नेमके स्वरूप आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय तपास करण्यात येत आहे. (Baramati Crime)
दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गणेश माने याला ताब्यात घेतले. (Baramati Crime)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी सुरू असून पुढील तपास माळेगाव पोलीस करत आहेत. (Baramati Crime)
या घटनेमागील नेमका घटनाक्रम, आरोपीचा उद्देश आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. (Baramati Crime)
OBC non-creamy layer : ओबीसी नॉन-क्रिमीलेअर मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढविण्याची शिफारस





