July 2026 Bank Holidays : जुलैमध्ये बँका 12 दिवस बंद! RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार?
July 2026 Bank Holidays : मात्र, या सुट्ट्या संपूर्ण देशभर एकाच दिवशी लागू होणार नाहीत. बहुतांश सुट्ट्या स्थानिक सणांशी संबंधित असल्याने त्या केवळ संबंधित राज्यांमध्येच लागू असतील.

July 2026 Bank Holidays : जुलै महिना सुरू झाला असून, बँकेशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जुलै महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये बँका एकूण १२ दिवस बंद राहणार आहेत.
या सुट्ट्यांमध्ये चार रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांसह विविध राज्यांतील प्रादेशिक सणांचा समावेश आहे. मात्र, या सुट्ट्या संपूर्ण देशभर एकाच दिवशी लागू होणार नाहीत. बहुतांश सुट्ट्या स्थानिक सणांशी संबंधित असल्याने त्या केवळ संबंधित राज्यांमध्येच लागू असतील. (July 2026 Bank Holidays)
त्यामुळे इतर राज्यांतील बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात सणामुळे देशभरातील सर्व बँका (Bank ) एकाच दिवशी बंद राहतील, असा एकही दिवस नाही. जुलैमधील साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये ५, १२, १९ आणि २६ जुलै हे चार रविवार, तर ११ जुलै (दुसरा शनिवार) आणि २५ जुलै (चौथा शनिवार) यांचा समावेश आहे.
हेही वाचा : Ram Temple theft: सॉक्समध्ये लपवल्या नोटा, CCTV ने उघड केला राम मंदिरातील घोटाळा
याशिवाय, ६ जुलै रोजी मुहर्रम (आशुरा), ९ जुलै रोजी मेघालयातील बेह दिंखलाम, १६ जुलै रोजी ओडिशा आणि मणिपूरमधील रथयात्रा, १७ जुलै रोजी मेघालयातील यू तिरोट सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि २२ जुलै रोजी त्रिपुरामधील खर्ची पूजेच्या निमित्ताने संबंधित राज्यांमध्ये बँका बंद राहतील. (July 2026 Bank Holidays)

July 2026 Bank Holidays : जुलैमध्ये बँका 12 दिवस बंद! RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार?
महाराष्ट्रात दिलासादायक बाब म्हणजे जुलै महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त बँक सुट्टी नाही. त्यामुळे राज्यातील बँकांचे व्यवहार नियमित सुरू राहतील. बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. मात्र, चेक जमा करणे, रोख रकमेचे व्यवहार किंवा शाखेत जाऊन करावी लागणारी इतर महत्त्वाची कामे सुट्ट्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





