1 ऑक्टोबरपासून UPIची ‘ही’ सुविधा बंद, फसवणूक रोखण्यासाठी NPCI चा मोठा निर्णय

UPI Payment | येत्या १ ऑक्टोबरपासून यूपीआयची ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा बंद करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI कडून हा निर्णय अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
एनपीसीआयने सर्व बँका आणि पेमेंटस ॲप्सला 1 ऑक्टोबर 2025 पासून यूपीआयवरील पीयर-टू-पीयर (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराना आळा बसणार आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी या सुविधेचा गैरवापर करून ग्राहकांना बनावट रिक्वेस्ट पाठवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात होते. ज्यामुळे सामान्य यूपीआय वापरकर्त्यांची फसवणूक केली जात होती. याबाबत आता NPCI ने माहिती दिली की, ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा बंद केली जाईल. यामुळे एका युझरला दुसऱ्या युझरला पैशांसाठी रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. UPI Payment |
काय आहे ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा?
या सुविधेद्वारे दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मिस्टर A कडून 1 हजार रुपये घ्यायचे असतील, तर तुम्ही तुमच्या यूपीआय अॅपद्वारे मिस्टर A ला ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ पाठवू शकता. त्याला नोटिफिकेशन मिळेल आणि पिन टाकल्यानंतर 1 हजार रुपये तुमच्या खात्यात येतील. मात्र सायबर गुन्हेगारांनी कलेक्ट रिक्वेस्टचा वापर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केल्याने चिंता व्यक्त केली जात होती. UPI Payment |
फसवणूक कशी होत होती?
ही सुविधा गरजूंना पैसे मागण्यासाठी आणि पैसे घेणाऱ्यांना रिमाइंडर पाठवण्यासाठी आणली गेली होती. पण फसवणूक करणाऱ्यांनी याचा गैरवापर सुरू केला. लॉटरीच्या नावाखाली ग्राहकांना सांगितले जायचे की, रिक्वेस्टला पिन टाकल्यावर पैसे तुमच्या खात्यात येतील. लोकांना वाटायचे की पैसे खात्यात येतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या खात्यातून पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जायचे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत होता. UPI Payment |
यूपीआय वापरावर परिणाम?
एनपीसीआयन स्पष्ट केलं की 1 ऑक्टोबर 2025 नंतर यूपीआय P2P कलेक्ट ची यूपीआय प्रोसेस करता येणार नाही. P2P कलेक्ट रिक्वेस्ट बंद करण्यात आली असली तरी मर्चंट कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकतात. सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच्या यूपीआय वापरावर याचा परिणाम होणार नाही. यूपीआयचा वापर नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
हेही वाचा :




