Balgandharva Award: चंद्रकांत काळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर
Balgandharva Award:

महापौर मंजुषा नागपुरे; उद्या बालगंधर्व जयंतीदिनी होणार सन्मान
Balgandharva Award: मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, निवेदक आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना यावर्षीचा पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याविषयी महापौर मंजुषा नागपुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २६ जून) दुपारी ४ वाजता बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण होणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प हार, फुलांचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराव्यतिरिक्त अन्य विशेष पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत, तसेच करोना मुळे सन २०२०, २०२१ या वर्षातील पुरस्कार वितरणही झाले नाहीत. तेही याच कार्यक्रमात प्रदान केले जाणार असल्याचे नागपुरे यांनी सांगितले. माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले, ज्येष्ठ कलाकार अनुराधा राजहंस यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.
२०२६ चे अन्य पुरस्कार
संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत- दीप्ती भोगले
बुकिंग क्षेत्रातील पुरस्कार- संदीप चव्हाण
दिग्दर्शन क्षेत्रासाठी- विनोद रत्ना
संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार- अनुष्का आपटे
पुरुषोत्तम करंडक विजेता २०२५- ओमकार कापसे
सन २०२० चे पुरस्कार
ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री- निर्मलाताई गोगटे (मुख्य पुरस्कार)
लेखन- दिग्दर्शन- किरण यज्ञोपवीत
नाट्य व्यवस्थापन- प्रवीण बर्वे
बॅकस्टेज आर्टिस्ट- संदीप देशमुख
संगीत रंगभूमीतील योगदान- रवींद्र कुलकर्णी
नव्या पिढीला रंगभूमीची आवड निर्माण करण्यासाठी विशेष योगदान- अनुराधा राजहंस
सन २०२१ चे पुरस्कार
शास्त्रीय संगीत गायन- डॉ. रेवा नातू (मुख्य पुरस्कार )
व्हायोलिन- रमा चोभे
नाट्य व्यवस्थापन- समीर हंपी
बहूआयामी नाट्यकर्मी- प्रसाद वनारसे
बॅकस्टेज आर्टिस्ट- गणेश माळवदकर
बॉक्स थिएटर निर्मिती- प्रवीण वैद्य





