Aam Aadmi Party in Bihar Election। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीविषयी आज मोठी घोषणा केली आहे, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेससोबत किंवा अन्य कोणासोबतही कोणत्याही प्रकारची युती केली जाणार नाही.” असेही स्पष्ट केले आहे. येत्या काही महिन्यांत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक रिंगणात उतरल्याने विरोधकांना ही निवडणूक जड जाणार का असा सवाल निर्माण झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी अशीही घोषणा केली की आम आदमी पक्ष पंजाब आणि गुजरातमध्येही निवडणुका लढवेल आणि सरकार स्थापन करेल. अलिकडेच गुजरातमधील विसावदर जागा आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम जागेवरील पोटनिवडणुकांमध्ये आपने विजय मिळवला. ओवेसी यांनी महाआघाडीला ऑफर दिली होती Aam Aadmi Party in Bihar Election। अलीकडेच हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत,” त्यांचा पक्ष महाआघाडीसोबत बिहारमध्येही निवडणूक लढण्यास तयार आहे.” असे म्हटले होते, तसेच ओवेसी यांनी,”एआयएमआयएमने या संदर्भात महाआघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधला असल्याचीही माहिती दिली होती. त्यासोबतच ‘आम्ही सीमांचल आणि सीमांचलच्या बाहेरही निवडणूक लढवू… जर ते युतीसाठी तयार नसतील, तर मी सर्वत्र निवडणूक लढवण्यास तयार आहे..’असे त्यांनी यावेळी म्हटले होते. निवडणूक आयोग मतदार यादीची पडताळणी का करत आहे, ? यावर बिहारमध्येही गदारोळ सुरू आहे याबाबत विरोधी पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की हे गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायाला मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र आहे. दिल्लीत आपचा पराभव झाला होता Aam Aadmi Party in Bihar Election। दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ‘आप’साठी मोठा धक्का होता. केवळ अरविंद केजरीवालच नाही तर मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांसारखे मोठे चेहरे निवडणुकीत पराभूत झाले, परंतु आता गुजरात आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकल्यानंतर, ‘आप’ पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्यात खूप जवळची लढत आहे हे निश्चित आहे. निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरशीची लढाई होणार आहे, त्यामुळे केजरीवाल यांच्या प्रवेशाचा निवडणूक समीकरणांवर काही परिणाम होईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.