फ्रान्स पॅलेस्टाईनला ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता देणार ; फ्रान्सच्या घोषणेने इस्रायलचा संताप

France Palestine। जागतिक शर्टावर मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी फ्रान्सने एक मोठे पाऊल उचलले आहे. फ्रान्सने पॅलेस्टाईनला ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. असे करणारा फ्रान्स हा पहिला G-7 देश बनणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचे पॅलेस्टाईनने स्वागत केले आहे, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या निर्णयावर संतापल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय लागू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये,”आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाझामधील युद्ध थांबवणे आणि लोकांना वाचवणे” असे म्हटले आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉनने पोस्टमध्ये काय लिहिले? France Palestine।
इमॅन्युएल मॅक्रोनने आपल्या पोस्टमध्ये.”आम्हाला तात्काळ युद्धबंदी, सर्व ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत हवी आहे,” आपण हमासचे निशस्त्रीकरण केले पाहिजे, गाझा सुरक्षित आणि पुनर्बांधणी केली पाहिजे आणि पॅलेस्टिनी राज्य निर्माण केले पाहिजे.” असे म्हटले आहे.
ऑक्टोबर २०२३ पासून पॅलेस्टिनी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे हे सांगावे लागेल. या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. इस्रायली सरकार पॅलेस्टाईनला वेगळ्या देशाचा दर्जा देण्यास विरोध करत आहे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे.
Consistent with its historic commitment to a just and lasting peace in the Middle East, I have decided that France will recognize the State of Palestine.
I will make this solemn announcement before the United Nations General Assembly this coming September.… pic.twitter.com/VTSVGVH41I
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) July 24, 2025
फ्रान्सच्या या पावलामुळे इस्रायलवर राजनैतिक दबाव निर्माण झाला आहे. आतापर्यंत १४० हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे, ज्यामध्ये युरोपातील डझनभराहून अधिक देशांचा समावेश आहे.
बेंजामिन नेतान्याहू काय म्हणाले? France Palestine।
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फ्रान्सच्या या निर्णयावर बोलताना, “इस्रायल राष्ट्राध्यक्ष म्हणून मी मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. हे पाऊल दहशतवादाला प्रोत्साहन देते आणि गाझाप्रमाणेच इराणचा आणखी एक प्रॉक्सी तयार करू शकते. अशा परिस्थितीत, पॅलेस्टिनी राज्य इस्रायलच्या उच्चाटनासाठी एक लाँच पॅड बनेल.”असे म्हणत फ्रान्सच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पॅलेस्टाईनच्या लोकांना काय हवे आहे?
पॅलेस्टिनींना वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि गाझा यांचा समावेश असलेला वेगळा देश हवा आहे. १९६७ च्या युद्धात हे सर्व भाग इस्रायलने ताब्यात घेतले होते. या निर्णयाबद्दल पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) ने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले आहेत. पीएलओचे उपाध्यक्ष हुसेन अल-शेख म्हणाले, “हे पाऊल आंतरराष्ट्रीय कायद्याप्रती फ्रान्सची वचनबद्धता आणि पॅलेस्टिनी लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे प्रतिबिंबित करते.”
फ्रान्सच्या निर्णयाने आश्चर्यचकित
फ्रान्सचे हे पाऊल आश्चर्यकारक आहे कारण ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा फ्रान्सने इस्रायलला पाठिंबा देऊ केला होता आणि ते ज्यूविरोधी घटनांचा निषेध करत आहे. अमेरिकेने गाझामध्ये युद्धबंदीबाबत कतारमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवली असताना मॅक्रॉन यांनी ही घोषणा केली आहे. या प्रकरणात हमासचा दृष्टिकोन चांगला नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
फ्रान्सच्या या निर्णयामुळे इस्रायलच्या समस्या वाढतील का? असा सेवाल यातून उपस्थित होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, फ्रान्स आणि दोन डझन देशांनी, बहुतेक युरोपीय देशांनी, इस्रायलच्या निर्बंधांचा आणि अन्न शोधण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पॅलेस्टिनींच्या हत्येचा निषेध केला.
वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहती
१९६७ च्या युद्धानंतर इस्रायलने पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतले आणि ते आपल्या राजधानीचा भाग मानते. त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर अनेक वसाहती स्थापन केल्या आहेत आणि याठिकाणी ५,००,००० हून अधिक यहूदी राहतात. या भागात ३० लाख पॅलेस्टिनी नागरिकही राहतात आणि याठिकाणी इस्रायलचे लष्करी राजवट आहे.





