बारामती (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे उपनेते विजय शिवतारे हे उद्या इंदापूर आणि बारामती तालुका दौऱ्यावर येणार आहेत. शिंदे गटाच्या विस्तारीकरणासाठी या बैठकीत चाचपणी केली जाणार असल्याचे समजते. नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दोनही पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकाबाबत देखील दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु असल्याचे दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून पक्षबांधणी सुरु केली होती. दरम्यान, शिवतारे हे सकाळी 11 वाजता प्रथम कार्यकर्त्यांसोबत इंदापूर विश्रामगृहावर बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असून पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत ते काही महत्वाची घोषणा करणार का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हे भाजप शिवसेनेचे आगामी लक्ष्य असून त्याबाबत बाळासाहेबांच्या शिवसेनेची काय भूमिका राहील हेदेखील यावेळी समोर येईल. Agriculture News : बारामतीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर सायंकाळी बारामती दौरा इंदापूर तालुक्यातील बैठकीनंतर सायंकाळी 4 वाजता शिवतारे हे बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भिगवण रोड येथील हॉटेल कृष्णसागर येथे ही बैठक होणार असून बैठकीनंतर बारामतीतील पत्रकारांशी ते संवाद साधतील.