बारामती( प्रतिनिधी) : बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात गुरूवार दि.( ३) रोजी ज्वारीची ५०० आवक झाली असून प्रतिक्विंटल ४८०१ उच्चांकी दर मिळाला तर चांगल्या दर्जेच्या गव्हाला रू. ३३०१ प्रति क्विंटल दर मिळाला.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मकेची उच्चांकी आवक होऊन चांगल्या मकेला प्रति क्विंटल रू. २२०० दर निघाला. तसेच बाजरी, सोयाबीन, सुर्यफुल या शेतमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल रू. ३५६१आणि सोयाबीनची ११६० क्विंटल आवक झाली सोयाबीनला प्रति क्विंटल रू. ५३१७ तर सुर्यफुलाची ७६० क्विंटल आवक होऊन सुर्यफुलास प्रति क्विंटल रू. ७०००दर मिळाला.
खरेदीदार म्हणुन आवारातील अमोल वाडीकर, बाळासो फराटे, महावीर वडुजकर, निलेश भिंगे, प्रताप सातव, दिपक मचाले, अशोक भळगट, सतिश गावडे, मिलिंद सालपे, शिवाजी फाळके, सिद्धार्थ गुगळे, संभाजी किर्वे, कल्पेश सोनवणे, यश संघवी यांनी सहभाग घेतला. बाजार आवारात शेतमालास चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांनी आपला शेतमाल स्वच्छ व ग्रेडींग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल असा विश्वास बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांना व्यक्त केला.
Baramati Crime News : बारामती शहर हादरले, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांचा युवकावर गोळीबार
शेतमाल आल्यानंतर प्रथम वजन नंतर लिलाव आणि लगेच पेमेंट शेतक-यांना मिळत असल्याने बारामती बाजारपेठे कडे शेतमाल विक्रीस आणन्यास शेतकरी उत्सुकता दाखवतात. चालु वर्षी बारामती व आसपासच्या तालुक्यात पाऊसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सर्वच शेतमालाच्या आवकेत वाढ झाली आहे. यापुढे शेतक-यांनी पिकांचे व्यवस्थित नियोजन करून सुधारित वाणांचा वापर करावा व जादा उत्पादन काढावे.शेतीत उत्पादित झालेला शेतमाल स्वच्छ व ग्रेडींग करून विक्रीस आणल्यास चांगला दर मिळेल व शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल असे सचिव अरविंद जगताप यांनी स्पष्ट केले.