भरत जाधवने केला बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर अन् म्हणाला…

मुंबई- अभिनेता भरत जाधव एका नव्या भूमिकेत आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. सुखी माणसाचा सदरा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतो आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो फार जुना फोटो आहे. सध्या मालिकेचं प्रमोशन जोरात सुरु आहे. त्याच दरम्यान केदार शिंदे आणि भरत जाधव जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे.
शिवसेनाप्रमुख होण्याआधी एक ग्रेट व्यंगचित्रकार म्हणून ख्याती.. मराठी माणसाला नेमकं काय हवंय? याची उत्तम जाण असलेलं व्यक्तीमत्व. आपल्या समस्या स्वत:च्या म्हणून मांडल्या आणि तडीस नेल्या.. त्यांना हा प्रयत्न अर्पण. दसऱ्याला मेळावा घेऊन सीमोल्लंघन करण्याची त्यांची पद्धत. सुखी माणसाचा सदरा प्रत्येक माणसाला देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. . आमचाही प्रयत्न तोच आहे, असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे.
दरम्याान, भरत जाधव आणि केदार शिंदे ही अफलातून जोडी पून्हा एकदा धुडगुस घालण्यासाठी सज्ज झाले आहे. मालिकेसाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





