Shivani Rangole: अभिनेत्री शिवानी रांगोळेने पायाला दुखापत असतानाही पूर्ण केला नाटकाचा प्रयोग; पोस्ट शेअर करत म्हणाली…
Shivani Rangole: शिवानी रांगोळेनं 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'सांग तू आहेस का?', 'बन मस्का' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Shivani Rangole: मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र पायाला दुखापत होऊनही तिने नाटकाचा प्रयोग सुरूच ठेवला. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
शिवानी रांगोळेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘नाटक करायला एका पायावर तयार! पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार ह्याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पाय ठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटका आधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते तो माझ्या वतीने करून ठेवणं.
मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं, नाटकात काही मूव्हमेंट्स ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या शंकर जयकिशनच्या सगळ्या टीमनी केलं !’
‘मला कित्येकदा पायात splinter आहे ह्याची जाणीव ही व्हायची नाही, उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हा भरत जाधव सर आणि महेश मांजरेकर सर मला आठवण करून द्यायचे, मला सांभाळून घ्यायचे! तेव्हा खूप कृतज्ञता वाटली.
View this post on Instagram
स्टेजवर जाईपर्यंत टेन्शन असायचं की, पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा! आता हळूहळू रिकव्हर होते आहे पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात,’ असेही शिवानीने म्हटले आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांंनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
शिवानी रांगोळेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’, ‘बे दुणे तीन’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
सध्या ती ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकामध्ये तिच्यासोबत भरत जाधव आणि महेश मांजरेकर सुद्धा आहेत. Shivani Rangole
हेही वाचा :





