कठीण काळात ‘जत्रा’तल्या भूमिकेतून कमबॅक! अक्का कशी वाट्याला आली? प्रिया बर्डेंनी सांगितला तो किस्सा

Priya Berde : दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार करणारे दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ‘अंग बाई अरेच्चा ‘या त्यांच्या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला उभारी दिली. यानंतर त्यांचा जत्रा सिनेमा आला. हा सिनेमा मराठीतला ‘कल्ट’ सिनेमा ठरला. गेल्या काही दिवसांपासून जत्रा २ येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्यापर्यंत अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. अशातच लोकमत फिल्मीला जत्रा सिनेमातील टीमने मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत जत्रा सिनेमातील कलाकारांचे रियुनियन झाल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमात अभिनेत्री प्रिया बेर्डेंची देखील महत्वाची भूमिका होती. अक्का हे पात्र त्यांनी या सिनेमात साकारलेलं आहे. या पात्राची अॅाफर त्यांना कशी मिळाली. याविषयी प्रिया बेर्डेंनी तो किस्सा सांगितला आहे. ज्यावेळी जत्रा हा सिनेमा आला होता, त्या काळातच मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य करणाऱ्या एका अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्याच काळात प्रिया बेर्डेंना अक्काच्या भूमिकेची विचारणा झाली होती.
कमबॅक करण मला आवश्यक होतं. माझ्या डोक्यात त्यावेळी काहीही आलं नाही आणि मी या भूमिकेसाठी पटकन होकार कळवला असल्याचं प्रिया बेर्डेंनी सांगितलं. कारण या सिनेमातील अक्काची भूमिका महत्वाची होती. तिच्याही पत्नीचे निधन झालं होतं. पण तरीही प्रिया बेर्डेंनी हे आव्हान स्विकारलं आणि भूमिकेला पूरेपूर न्याय दिला. यामुळे जत्रा सिनेमातली अक्का सगळ्यांच लक्षात राहिली.
काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?
त्या एजला अनुसरुन मला जी भूमिका केदारने अॅाफर केली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हा विचार आलाच नाही, आता लक्ष्मीकांत गेलेत आणि त्याने मला अशा पद्धतीचा रोल विचारला आहे. तर वेगळ काहीतरी आहे असं मला वाटलं. त्याने मला एकच सांगितलं की हे बघ येथे काही नाच वैगेरे काही नाही ही एक संरपंचाची भूमिका आहे खूप तडफदार भूमिका आहे. मलाही कामाची गरज होती, त्यामुळे माझ्या डोक्यात तसं काहीही आलं नाही. मी ती भूमिका आनंदाने स्विकारली, असं प्रिया बेर्डेंनी सांगितलं.





