Bakri Eid Satara : सातार्यात बकरी ईदचा उत्साह; पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ‘या’ खास गोष्टीने
Bakri Eid Satara : सातार्यात पारंपरिक पद्धतीने बकरी ईद साजरी; खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मुस्लिम बांधवांना खास शुभेच्छा.

Bakri Eid Satara – सातारा शहरासह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद (ईद- उल- अजहा) गुरुवारी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. शहरातील मशिदी व ईदगाह परिसरात पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली होती. नव्या पोशाखात आलेल्या नागरिकांनी नमाज पठण करत शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
या पवित्र सणानिमित्त खासदार उदयनराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. बकरी ईद हा त्याग, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण असून समाजात ऐक्य आणि सौहार्द अधिक दृढ व्हावे, अशा भावना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या.
सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील भागांत पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात आली. मात्र, संपूर्ण सण शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले. बकरी ईदच्या निमित्ताने सातार्यात पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडले.





