Bajrang Sonwane : मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला अपघात, परिसरात तणाव
Bajrang Sonwane : बीड-केज मार्गावर खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात झाला आहे.

Bajrang Sonwane : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिली. (Bajrang Sonwane)
या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यातला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या कारच्या काचा फुटल्या. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. (Bajrang Sonwane)
Bajrang Sonwane : मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला अपघात, परिसरात तणाव
खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्यावेळी ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. (Bajrang Sonwane)
या अपघातात बजरंग सोनवणे यांना काही झाले नाही पण त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Bajrang Sonwane)
हेही वाचा :





