Pratap Sarnaik : एसटीमध्ये आपली बस, आपली सेवा अभियान सुरु होणार ; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
एसटी बससेवा अधिक प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. 1 मे 2026 पासून हे अभियान राज्यभर राबवले जाणार असून, या माध्यमातून सेवेमध्ये शिस्त, स्वच्छता आणि मानवी दृष्टिकोणाला प्राधान्य दिले (Pratap Sarnaik) जाणार आहे.

Pratap Sarnaik : राज्यातील एसटीप्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपली बस, आपली सेवा हे नविन अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत घोषणा केली आहे.
या उपक्रमातून प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी बससेवा अधिक प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
1 मे 2026 पासून हे अभियान राज्यभर राबवले जाणार असून, या माध्यमातून सेवेमध्ये शिस्त, स्वच्छता आणि मानवी दृष्टिकोणाला प्राधान्य दिले (Pratap Sarnaik) जाणार आहे.
सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, बसेसची संख्या वाढत असली तरी प्रवाशांची संख्या आणि महसूलात अपेक्षित प्रमाणात वाढत होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत चालक आणि वाहक यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिला जाणार आहे. बस सुटण्यापूर्वी स्वच्छता, वेळेवर उपस्थिती, नीटनेटकेपणा आणि शिस्तबद्ध वागणूक या गोष्टी अनिवार्य करण्यात येणार आहेत. तसेच चालकाने प्रवासाची माहिती देत प्रवाशांशी संवाद साधण्यावरही भर असणार आहे.
तसेच, प्रवासादरम्यान बस रद्द होणे किंवा अन्य अडथळे निर्माण झाल्यास प्रवाशांना तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानकांची स्वच्छता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारीही (Pratap Sarnaik) अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
हे अभियान केवळ सेवा सुधारणा नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे एसटी प्रवास अधिक सुखद, सुरक्षित आणि समाधानकारक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.






