Korea Masters 2024 (Badminton) : किरण जॉर्जची विजयी मोहीम उपांत्य फेरीत संपुष्टात….

Korea Masters 2024 (Badminton) : भारताचा शटलर किरण जॉर्जची (Kiran George) कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी मोहीम शनिवारी (इक्सान सिटी ,कोरिया) येथे पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत थायलंडच्या कुनलावुत विटिडसर्नकडून (K. George vs K. Vitidsarn) पराभूत झाल्यामुळे संपुष्टात आली.
Kiran George’s impressive Korea Masters run concludes with a 12-21, 20-22 loss to reigning World Champion Kunlavut Vitidsarn in the semi-finals. 🇮🇳
Proud performance, Kiran! 👏🏽#Badminton #SKIndianSports pic.twitter.com/C5aLXASlnF
— Sportskeeda (@Sportskeeda) November 9, 2024
या बीडब्ल्यूएफ BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 41व्या क्रमांकावर असलेल्या 24 वर्षीय भारतीय खेळाडूला अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या विटिडसर्नकडून 12-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. यासह स्पर्धेतील भारताची मोहीमही जॉर्जच्या उपांत्य फेरीतील पराभवाने संपुष्टात आली आहे. कारण या स्पर्धेत सहभागी झालेला किरण हा एकमेव भारतीय खेळाडू होता.
Korea Masters 2024 (Badminton) : भारतीय शटलर ‘किरण जॉर्ज’चा विजयी धडका कायम…
प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (पीपीबीए) येथे प्रशिक्षण घेत असलेल्या जॉर्जने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित जपानच्या ताकुमा ओबायाशीचा पराभव करून उलटफेर केला होता. त्यानं ओबायाशी याचा 21-14, 21-16 असा अवघ्या 39 मिनिटांत पराभव केला होता.





