मधुमेहावर ‘आयुर डायबेट’, रक्तदाबावर ‘आयुर कार्ड’ स्वरस: पुण्यात आयुर्वेदीय औषधांचे लोकार्पण

पुणे- मधुमेह आणि हृदयरोगांवर प्रभावी उपाय म्हणून ‘आयुर डायबेट’ आणि ‘आयुर कार्ड’ स्वरस बाजारात दाखल झाले आहेत. पुण्यातील सोहम सिद्धतत्वम संस्थेने निर्मित या आयुर्वेदीय स्वरसांचे लोकार्पण बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात झाले. “आयुर डायबेट स्वरस रक्तातील साखर नियंत्रित करते, तर आयुर कार्ड स्वरस रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते,” असे आयुर्वेदाचार्य वैद्य नीरज कामठे यांनी सांगितले.
लोकार्पण सोहळ्यास दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, सोहम सिद्धतत्वमचे संस्थापक शुभम मुंदडा, निलेश सारडा, मनमोहन मंत्री उपस्थित होते. वैद्य कामठे म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान आणि आयुर्वेद यांची सांगड घालून ही औषधे रुग्णांना दिलासा देतील.”
शुभम मुंदडा यांनी सांगितले, “वैद्य सुकुमार सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध आणि परंपरागत आयुर्वेदीय उत्पादने बनवत आहोत. या स्वरसांसह आवळा ज्यूस, गुलकंद, पेनकेअर ऑइल यांसारख्या उत्पादनांचा लोकांना लाभ होत आहे.” महेश सूर्यवंशी यांनी बाप्पांच्या आशीर्वादाने रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सोहम सिद्धतत्वम जगभर आयुर्वेदाचा प्रसार करत आहे.





