DC vs RCB : “ये तू खेळ ना, मजाक करु नको…”, RCBच्या प्रशिक्षकाने DCच्या कर्णधाराला फटकारले

DC vs RCB Axar Patel and Dinesh Karthik Fun Banter : आयपीएल २०२५ चा ४६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. या सामन्यापूर्वी अरुण जेटली स्टेडियममध्ये एक मजेदार आणि आनंददायी क्षण पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आणि आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिक यांच्यात एक मजेदार संवाद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षर पटेलला नेटमध्ये सराव करताना पाहून दिनेश कार्तिक तिथे पोहोचला. अक्षरने त्याला पाहताच, ताबडतोब फलंदाजी थांबवली आणि त्याला भेटण्यासाठी नेट बाहेर येऊन उभा राहिला. या घटनेने कार्तिक थोडासा लाजला आणि हसत म्हणाला, “ये तू खेळ ना, मजाक करु नको. कर्णधारासारखे वाग आणि माझे लक्ष विचलित करू नकोस!” आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
KL Rahul with Dinesh karthik ❤️
Bengaluru boy and Bengaluru player bond go well champ KL 💙 #DCvsRCBpic.twitter.com/Tnd8xSbU2R
— Pragadees 🇮🇳 (@pragadees20O6) April 26, 2025
दिल्लीचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे –
दिल्ली कॅपिटल्स सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि आठ सामन्यांतून १२ गुणांसह पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात केएल राहुलच्या शानदार कामगिरीमुळे दिल्लीने आरसीबीचा पराभव केला. आज आरसीबी संघ निश्चितच बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. आजचा सामना खूप रंजक असणार आहे.
हेही वाचा – MI vs LSG : दोन षटकार बसल्यानंतर मयंक यादवने सुधारली चूक, हिटमॅनला ‘असा’ दाखवला तंबूचा रस्ता
जॅक फ्रेझर मॅकगर्कने अक्षरचे केले कौतुक –
डीसीचा युवा खेळाडू जॅक फ्रेझर-मॅकगर्कने अक्षरचे कौतुक करताना म्हणाला की, “तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याचा प्रत्येकजण आदर करतो आणि ज्याच्यासाठी नेतृत्व स्वाभाविकपणे येते. तो संघात सकारात्मक वातावरण राखतो आणि नेहमी हसत राहण्याचा सल्ला देतो. त्याच्यासोबत असे वाटते की तुम्ही तुमच्या कर्णधाराशी नाही तर जुन्या मित्राशी बोलत आहात.”





