Auto rickshaw: स्कूल बस पाठोपाठ आता रिक्षा चालकांचीही मनमानी; दरवाढीमुळे पालकांचं बजेट कोलमडलं
Auto rickshaw: शालेय साहित्य खरेदीच्या खर्चातच आता रिक्षा चालकांकडून प्रति विद्यार्थी २०० ते ४०० रुपयांची मनमानी दरवाढ; पालकांकडून तीव्र संताप.

Auto rickshaw – पेट्रोल, डिझेल च्या दरवाढीने स्कूल बस चालकांनी 15 टक्के भाडे वाढ केली. या पाठोपाठ रिक्षा चालकांनीही भाडेवाढ केल्याने पालकांच्या खिशावर महागाईचा भार चांगलाच वाढला आहे. अनेक पालकांनी स्कूल बस, रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींना ही भाडेवाढ सहन करणे हाच पर्याय राहिला आहे.
गेल्या काही दिवसात चार वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 112.54 लिटर, डिझेल 99.33 लिटर, सीएनजी 95.50 किलो मीटर असे नवे दर आहेत. या वाढत्या दरामुळे प्रवाशी वाहनांना फटका बसला आहे. यामध्ये स्कूलबस, रिक्षा यांना जास्त झळ सोसावी लागत आहेत. याच उत्पन्नातून त्यांना घर ही चालवावे लागत आहेत. तसेच वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च ही करावा लागत आहे.
ही बाब विचारात घेता स्कूल बस चालकांनी 15 टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ नवीन शैक्षाणिक वर्षाच्या सुरुवातील करण्यात आली आहे. पालकांवर मुलांच्या शालेय साहित्य खरेदीचा भार असताना ही भाडेवाढ लादण्यात आल्याची अनेक पालकांची प्रतिकिया आहे. यात रिक्षा चालकांनी भर घातली आहे. अनेक पालकांची मुले रिक्षाने शाळेत जातात.
या रिक्षा चालकांनी मनाने भाडेवाढ केली आहे. दर विद्यार्थ्यामागे दोनशे ते 400 रुपये वाढवून मागत आहेत. ते देण्यास पालकांनी नकार दिल्यास मुलांना नेउ शकत नाही असे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक पालकांच्यात आणि रिक्षा चालकांच्या वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. काही पालकांना ही भाडेवाढ मंजूर करणे भाग पडत आहे. यावर चालकांनी व पालकांनी मिळून तोंडगा काढण्याची गरज असताना रिक्षा चालक मनमानी कारभार करत असल्याचे पालकंकडून सांगण्यात येत आहे.




