CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ ; ११ दिवसामध्ये चौथ्यांदा वाढ
CNG Price Hike: महागाईची काही केल्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वांना चिंतेत टाकले असताना, आता आता आणखी भर पडली आहे .

CNG Price Hike: महागाईची काही केल्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वांना चिंतेत टाकले असताना, आता आता आणखी भर पडली आहे. पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीदेखील सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करत आहे.
सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज दिल्लीत सीएनजी २ रुपयांनी महाग झाला आहे. कालपर्यंत सीएनजीचा दर ८१.०९ रुपये होता, तर आता २ रुपयांच्या वाढीनंतर दिल्लीत सीएनजी ८३.०९ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होईल.
११ दिवसांत चौथ्यांदा सीएनजी दरात वाढ (CNG Price Hike)
आज, २६ मे रोजी झालेल्या ₹२ च्या वाढीपूर्वीच, शनिवार, २३ मे रोजी सीएनजीच्या दरात ₹१ प्रति किलोने वाढ झाली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर ₹८०.०९ होता, जो आता वाढून ₹८१.०९ झाला आहे. मे महिन्यात आतापर्यंत सीएनजीच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे.
शहरांनुसार सीएनजीचे दर – (CNG Price Hike)
दिल्ली: ₹८३.०९ प्रति किलो
नोएडा: ₹९१.७० प्रति किलो
गुरुग्राम: ₹८४.१२ प्रति किलो
गाझियाबाद: ₹१०२.९० प्रति किलो
फरीदाबाद: ₹९०.३० प्रति किलो
मुंबई: ₹८१.०० प्रति किलो
कोलकाता: ₹९३.५० प्रति किलो
चेन्नई: ₹९१.५० प्रति किलो
बंगळूर: ₹९०.०० प्रति किलो
हैदराबाद: ₹९७.०० प्रति किलो
अहमदाबाद: ₹८२.२५ प्रति किलो
पुणे: ₹९२.५० प्रति किलो
सोनीपत: ₹८६.६० प्रति किलो
कर्नाल: ₹८५.४३ प्रति किलो
लखनौ: ₹९५.७५ प्रति किलो
आग्रा: ₹९५.७५ प्रति किलो
मेरठ: ₹८६.०५ प्रति किलो
पाटणा: ₹८७.९० प्रति किलो
इंदूर: ₹९३.५५ प्रति किलो
जयपूर: ₹९०.९१ प्रति किलो
सुरत: ₹८२.९५ प्रति किलो
मुंबईत दरात कोणताही बदल नाही? CNG Price Hike:
मुंबईत सीएनजीचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात दरात ५० पैशांनी वाढ झाली होती आणि तेव्हापासून दर ८१ रुपयांवर स्थिर आहे.






