US Open 2025 : नोव्हाक जोकोविचचा ऐतिहासिक विजय! फेडररलाही मागे टाकत नव्या विक्रमाची केली नोंद

Novak Djokovic Sets New Record : टेनिसमधील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन 2025 मध्ये आणखी एक इतिहास रचला आहे. वयाच्या 38 व्या वर्षी त्याने टूर्नामेंटच्या चौथ्या फेरीत प्रवेश करताना सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून अंतिम 16 मध्ये स्थान मिळवले आहे. यापूर्वी हा विक्रम जिमी कॉनर्सच्या नावावर होता, ज्यांनी 1991 मध्ये ही कामगिरी केली होती.
नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास –
जोकोविचने यासह मेजर टूर्नामेंटमधील हार्डकोर्टवरील सर्वाधिक विजयांच्या बाबतीत रॉजर फेडररला मागे टाकत 102 वा विजय नोंदवला. त्याने ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नॉरी याला 6-4, 6-7(4), 6-2, 6-3 अशा स्कोअरलाइनने पराभूत करत हा विजय मिळवला. या विजयासह त्याने नॉरीविरुद्धचा आपला विक्रमी स्कोअर 7-0 असा मजबूत केला. चार वेळचा यूएस ओपन विजेता जोकोविचचा पुढील सामना जर्मनीच्या जान-लेनार्ड स्ट्रफ याच्याशी होणार आहे.
सामन्यातील आव्हाने आणि जोकोविचचा संघर्ष –
Novak Djokovic the greatest has won more than anyone even surpassed great Roger Federer 192 in hard court Grand slam.#novakdjokovic #Novak #USOpen2025 pic.twitter.com/MwnYzPMfSf
— Samiran Datta (@SamiranDatta5) August 30, 2025
सामन्यानंतर नोव्हाक जोकोविच म्हणाला, “कोणत्याही सामन्यात तुम्हाला थेट सेट्समध्ये नाट्यविनावी विजय मिळवायचा असतो, पण ते शक्य होत नाही. माझ्या टीमला वाटतं की मी कोर्टवर अधिक संघर्ष करावा, जेणेकरून मी सामना खेळण्यात जास्त वेळ घालवावा. विम्बल्डननंतर मी एकही सामना खेळलो नव्हतो. मी अजूनही कोर्टवर माझी लय आणि ताल शोधण्याचा प्रयत्न करत आहे.” पहिल्या सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतल्यानंतर जोकोविचला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवला. त्याने उपचारासाठी काही वेळ कोर्ट सोडले आणि नंतर सेट पूर्ण करण्यासाठी परतला.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला त्याने अधिक सावध खेळ केला, ज्यामुळे त्याच्या सर्व्हिसचा वेग कमी झाला. दुसऱ्या सेटमध्ये नॉरीने कडव्या टायब्रेकरमध्ये बाजी मारली. तथापि, तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने जोरदार पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकले आणि सेट आपल्या नावावर केला. चौथ्या सेटमध्ये त्याने पूर्णपणे वर्चस्व राखत विजय निश्चित केला. जोकोविच्या या विजयाने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला असून, तो पुढील सामन्यातही असाच दमदार खेळ करेल, अशी अपेक्षा आहे.





