Australian Open 2024 : बालाजी-कॉर्निया पुरुष दुहेरीत पराभूत….

मेलबर्न – भारताचा एन श्रीराम बालाजी आणि त्याचा रोमानियन जोडीदार व्हिक्टर व्लाड कॉर्निया यांना शनिवारी येथे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत एल साल्वाडोरच्या मार्सेलो अरेव्हालो आणि क्रोएशियाच्या मेट पॅव्हिक यांच्याकडून ३-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, रोहन बोपण्णा आणि त्याची जोडीदार टिमा बाबोस यांनी मिश्र दुहेरी स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिश्र दुहेरीच्या ड्रॉमध्ये दुसरा कोणताही भारतीय नाही.
बालाजी आणि कॉर्निया यांनी पहिल्या फेरीत मॅटेओ अर्नाल्डी आणि अँड्रिया पेलेग्रिनो या इटालियन जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला होता. बालाजी-कॉर्निया संघ या स्पर्धेत पर्यायी जोडी म्हणून उतरला. एटीपी दुहेरी क्रमवारीत भारतीय ७९व्या तर रोमानियन ६९व्या स्थानावर आहे.
Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…
बालाजीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश करण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी सहकारी भारतीय जीवन नेदुंचेझियान सोबत असे केले होते. डच जोडीदार रॉबिन हासेसह युकी भाम्ब्री स्पर्धेतून आधीच बाहेर पडला आहे आणि विजय सुंदर प्रशांत आणि अनिरुद्ध चंद्रशेखर ही भारतीय जोडी अद्याप खेळत आहे.





