Australian Open 2024 : अल्कराझला पराभवाचा धक्का देत झ्वेरेवची उपांत्य फेरीत धडक…

मेलबर्न – सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोवीचला स्पर्धक मानला जात असलेल्या कार्लोस अल्कराझला यंदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. त्याला जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवने पराभवाचा धक्का दिला. ज्वेरेवने अल्कर्झवर 6-1, 6-3, 6-7, 6-4 असा पराभव केला.
या सामन्यातील पहिले दोन सेट ज्वेरेवने सहज जिंकले. तिसऱ्या सेटमध्येही ज्वेरेव 5-2 असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर अल्कराझने पुनरागमन केले. त्याने ज्वेरेवची सव्र्हिस दोन वेळा भेदली आणि सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकरमध्ये अल्कराझला 7-2 असा विजय मिळवण्यात यश आले.
चौथ्या सेटमध्ये मात्र अल्कराझ सर्वोत्तम खेळ करण्यात पुन्हा अपयशी ठरला. याचा फायदा घेत ज्वेरेवव्हने सेटमध्ये बाजी मारत कारकीर्दीत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या फेरीत त्याच्यासमोर तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचे आव्हान असेल.
महिलांच्या एकेरीत चीनच्या क्विनवेन झेंगने अॅना कालिन्स्कायाचा पराभव करत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. 12 व्या मानांकित झेंगने ही लढत 6-7, 6-3, 6-1 अशी जिंकली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या दयाना यास्त्रेमस्काने चेक प्रजासत्ताकच्या लिन्डा नोस्कोवाला 6-3, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
Australian Open 2024 : बोपण्णा-एब्डेन विक्रमापासून फक्त एक पाऊल दूर…
सबालेन्काची गॉफवर मात…
बेलारुसची स्टार खेळाडू आर्यना सबालेन्काने स्पर्धेतील सनसनाटी निकाल देताना अंतिम फेरी गाठली. तिने अमेरिकेची अव्वल खेळाडू कोको गॉफ हीच्यावर उपांत्य फेरीच्या लढतीत 7-6, 6-4 अशी मात केली व थाटात अंतिम फेरी गाठली.





