US Open 2024 : बालाजी-अँड्रॉझीचे आव्हान संपुष्टात…

US Open 2024 : भारतीय खेळाडू एन श्रीराम बालाजी आणि त्याचा अर्जेंटिनाचा साथीदार गुइडो अँड्रॉझी यांना दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस आणि ग्रेट ब्रिटनचा नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभव स्विकारावा लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बालाजी-अँड्रॉझी जोडीला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात व्हीनस आणि स्कुप्स्की या जोडीनं 6-7 (4), 4-6 असे पराभूत केले.
दुसरीकडे भारताचा युकी भांबरी आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीनं पहिला सेट गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत ऑस्टिन क्रॅजिसेक आणि जीन-ज्युलियन रॉजर यांचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे.
US Open 2024 : आणखी एक मोठा उलटफेर, गतविजेत्या स्टार टेनिसपटूला तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का…
तसेच आणखी एक भारतीय खेळाडू रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन (Rohan Bopanna-Matthew Ebden) या द्वितीय मानांकित जोडीनेही स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवत उप उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.





