Australian Open 2024 : अमेरिकेच्या ‘कोको गॉफ’ची चौथ्या फेरीत धडक….

मेलबर्न :- अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने तिसऱ्या फेरीत आपलीच देश सहकारी अलिसा पार्कसचा 6-0,6-2 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
महिला एकेरीत अन्य लढतीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्कानेही चौथ्या फेरीत प्रवेश करताना युक्रेनच्या लिसा विक्तोरना सुरेन्कोवर 6-0,6-0 अशी मात केली. मेग्देल्ना आंद्रेवाने डायना पेरीचा 1-6, 6-1, 7-6 असा पराभव केला. मेग्देलिना फ्रेचने अनास्थाशिया झाकारोव्हावर 4-6, 7-5, 6-4 अशी मात केली.
Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…
जोकोविचचा स्पर्धेतील सलग 31वा विजय…
पुरुष एकेरीत जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची चौथी फेरी गाठली आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने अर्जेंटिनाच्या थॉमस एचेवेरीचा 6-3, 6-3, 7-6 (7-2) अशा फरकाने पराभव केला. सर्बियाच्या जोकोविचने हा सामना दोन तास 28 मिनिटांत जिंकला. थॉमस एचेवेरीने पहिल्या फेरीत ब्रिटनच्या अँडी मरेला आणि दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्सचा पराभव करून खळबळ उडवून दिली, पण त्याला जोकोविचचा सामना करता आला नाही.
नोव्हाकची विषेश कामगिरी…
नोव्हाकचे लक्ष 11व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यावर आहे. या स्पर्धेत त्याने सलग 31 वा विजय मिळवला आहे. Opta Ace च्या मते, ओपन एरामध्ये ग्रँड स्लॅममध्ये सलग 30 हून अधिक एकेरी सामने जिंकणारी तो मोनिका सेलेसनंतरची दुसरा खेळाडू आहे.
जोकोविचने केली फेडररची बरोबरी…
चौथी फेरी गाठून जोकोविचने माजी स्विस टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली. गेल्या 45 वर्षांत वयाच्या 36 वर्षांनंतर केवळ दोनच खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहोचले आहेत. फेडररने ही पहिली कामगिरी केली होती. आता जोकोविच या यादीत सामील झाला आहे. फेडररने वयाच्या 36 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. 2018 मध्ये त्याने ही कामगिरी केली.
पुरुष एकेरीत अन्य लढतीत चेक प्रजासत्ताकच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रान्सच्या लुका वॅन असाशेचा 6-3, 6-0, 6-4 असा पराभव केला.





