Ellyse Babar Photo : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सुंदरी एलिस पेरीने बाबर आझमला केलं प्रपोज? फोटो होतोय व्हायरल

Ellyse Perry Babar Azam Photo Viral : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एलिस पेरी गुडघ्यावर बसून बाबरला लग्नासाठी प्रपोज करत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हायरल फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे? जाणून घेऊया.
काय आहे सोशल मीडियावरील दावा?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६ दरम्यान एका सामन्यात एलिस पेरीने बाबर आझमला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि बाबरने तो स्वीकारला. या दाव्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं.
Love strikes in the BBL! 💖
A magical moment as Babar Azam gets the ultimate surprise in his Sydney Sixers kit. Who knew cricket could be this romantic? Definitely the match of the season! 💍🏏”#BabarAzam #SydneySixers #BBL #BigBashLeague #Cricket #Proposal #Love #CricketReels pic.twitter.com/0Arkr9kUvS
— Fakhar Bajwa 🏏 (@BajwaKehtaHaii) January 8, 2026
पडताळणीत सत्य आलं बाहेर –
तांत्रिक तपासाअंती हा फोटो पूर्णपणे बनावट (Fake) असल्याचे सिद्ध झाले आहे. या फोटोबाबतचे महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत:
- AI ची करामत: हा फोटो कोणत्याही कॅमेऱ्याने टिपलेला नसून तो ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. फोटोतील प्रकाश, खेळाडूंच्या चेहऱ्यांवरील हावभाव आणि पार्श्वभूमीतील प्रेक्षकांचे नीट निरीक्षण केल्यास त्यात अनेक तांत्रिक चुका दिसून येतात.
- दोघेही वेगवेगळ्या देशांत होते: ज्यावेळी हा फोटो व्हायरल झाला, तेव्हा एलिस पेरी न्यूझीलंडमध्ये ‘विमेन्स सुपर स्मॅश’ लीग खेळत होती. तर बाबर आझम ऑस्ट्रेलियात सिडनी सिक्सर्सकडून बीबीएलमध्ये खेळत होता. त्यामुळे त्यांची भेट होणेही अशक्य होते.
- अधिकृत दुजोरा नाही: कोणत्याही अधिकृत क्रीडा वाहिनीने किंवा स्वतः खेळाडूंनी अशा कोणत्याही घटनेची पुष्टी केलेली नाही.
चाहत्यांना आवाहन –
Ellyse Perry proposes to Babar Azam in BBL😭 pic.twitter.com/zqB9NmkI34
— Venkat ⚡️ (@WealthArigato) January 9, 2026
सोशल मीडियावर केवळ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी असे ‘क्लिकबेट’ फोटो व्हायरल केले जात आहेत. चाहत्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. एलिस पेरी आणि बाबर आझम यांच्या प्रपोजलच्या बातम्या पूर्णपणे तथ्यहीन आहेत.





