Shweta Tiwari: नवीन वर्षाआधी श्वेता तिवारी वेकेशनवर; परदेशातून शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated On:-9 फोटो
Photo 1
1 / 9

आणखी संबंधित फोटो

Shweta Tiwari : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या परदेशात सुट्टी एन्जॉय करत आहे. नवीन वर्षाच्या आधी तिनं वेकेशनसाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला असून, तिथून ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

shweta tiwari

shweta tiwari

श्वेताने तिचा मुलगा रेयांशसोबत परदेशातच ख्रिसमस साजरा केला होता आणि आता ती नवीन वर्षही मुंबईबाहेरच साजरं करणार असल्याचं दिसत आहे.

shweta tiwari

shweta tiwari

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता खूपच स्टायलिश आणि तरुण दिसत आहे. तिनं ग्रे रंगाचा स्वेटर आणि काळी पँट परिधान केली असून, ज्या ठिकाणी ती थांबली आहे तिथून समोर समुद्राचं सुंदर दृश्य दिसत आहे.

shweta tiwari

shweta tiwari

या फोटोंसोबत श्वेतानं “क्लिक” असं साधं कॅप्शन दिलं आहे. ४५ वर्षांची असूनही श्वेता अजूनही तरुण दिसते, त्यामुळे चाहत्यांनी तिला ‘संतूर मम्मी’ असं म्हणत कौतुक केलं आहे.

shweta tiwari

shweta tiwari

श्वेताच्या या पोस्टला हजारो लाइक्स मिळाले असून, कमेंटमध्ये चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. “खूप सुंदर दिसताय”, “वयाचा अंदाजच लागत नाही” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

shweta tiwari

shweta tiwari

याआधी श्वेतानं ख्रिसमस साजरा करतानाचा एक व्हिडीओही शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये ती मुलगा रेयांश आणि मित्रांसोबत फिरताना दिसत आहे. त्यावर तिनं “कृतज्ञता, कृपा आणि चांगल्या ऊर्जेसोबत नवीन वर्षाचं स्वागत” असं कॅप्शन दिलं होतं.

shweta tiwari

shweta tiwari

दरम्यान, श्वेताची मुलगी पलक तिवारीदेखील नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मुंबईबाहेर रवाना झाली आहे. तिला अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत विमानतळावर पाहिलं गेलं होतं.

shweta tiwari

shweta tiwari

आणखी संबंधित बातम्या

Shweta Tiwari : 4 अफेअर्स, दोनदा लग्न; श्वेता तिवारीच्या खाजगी आयुष्यात बरंच काही घडलं, वाचून बसेल धक्का!

Shweta Tiwari : 4 अफेअर्स, दोनदा लग्न; श्वेता तिवारीच्या खाजगी आयुष्यात बरंच काही घडलं, वाचून बसेल धक्का!

Shweta Tiwari: फिटनेससोबत त्वचेचीही काळजी! जिमला जाण्यापूर्वी श्वेता तिवारीचा हा सोपा स्किनकेअर रूटीन जाणून घ्या

Shweta Tiwari: फिटनेससोबत त्वचेचीही काळजी! जिमला जाण्यापूर्वी श्वेता तिवारीचा हा सोपा स्किनकेअर रूटीन जाणून घ्या

Shweta Tiwari : आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ

Shweta Tiwari : आता पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टने खळबळ

Shweta Tiwari : "राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी..."; अभिनेत्री श्वेता तिवारी CJP वर बरसली म्हणाली "मी सोनम वांगचुक..."

Shweta Tiwari : "राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी..."; अभिनेत्री श्वेता तिवारी CJP वर बरसली म्हणाली "मी सोनम वांगचुक..."