Haiwaan Box Office Collection : ‘हैवान’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; आतापर्यंत केवळ ‘इतकेच’ कमावले, पाहा बॅाक्स अॅाफिस कलेक्शन
Haiwaan Box Office Collection : चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवसांपासून आतापर्यंत केवळ ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हैवानकडे प्रेक्षकांनी पाठ फरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Haiwaan Box Office Collection : ‘भूत बंगला’च्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत ‘हैवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल १८ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची एकत्र जोडी दिसत असल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
‘हैवान’ हा सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवसापासून आतापर्यंत केवळ ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हैवानकडे प्रेक्षकांनी पाठ फरवल्याचे चित्र आहे.
चौथ्या दिवशी कमाईत मोठी घसरण
‘हैवान’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होत गेली. Sacnilkच्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ‘हैवान’ने ७० लाख रुपयांची कमाई केली.
मोठे कलाकार आणि मोठे बजेट असलेल्या चित्रपटासाठी ही कमाई अपेक्षेच्या तुलनेत खूपच कमी आहे. चार दिवसांच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ८ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.
‘हनुमान’ अंश’चा परिणाम?
‘हैवान’च्या कमी कमाईमागे सध्या बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नीम करोली बाबांवरील या बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याचा परिणाम इतर चित्रपटांच्या शो आणि प्रेक्षकसंख्येवर होत आहे.
Rinku Singh : लग्नाचा मुहूर्त ठरला! रिंकू सिंह अन् प्रिया सरोज ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात





