Asmita Judo Gold : अस्मिता डेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रचला इतिहास! ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय
Asmita Judo Gold : महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अस्मिताने कॅनडाच्या हेडी काच हिचा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

Asmita Dey Wins Gold Medal Womens 48kg Judo Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow CWG 2026) भारतीय महिला जुडोपटू अस्मिता डे (Asmita Dey) हिने इतिहास रचला आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अस्मिताने कॅनडाच्या हेडी काच हिचा पराभव करत सुवर्णपदक (Gold Medal) आपल्या नावे केले. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासामध्ये जुडो (Judo) या खेळात सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
‘गोल्डन स्कोअर’मध्ये मारली बाजी!
अस्मिताचा या संपूर्ण स्पर्धेतील प्रवास अत्यंत प्रभावी राहिला. तिने क्वार्टर फायनलमध्ये स्कॉटलंडच्या ईवा इविंगचा ‘इप्पोन’ने (Ippon) पराभव केला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये स्कॉटलंडच्याच समर शॉ हिला ‘युको’ने (१-०) मात देत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात कॅनडाच्या हेडी काचविरुद्ध अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली, जिथे अस्मिताने ‘गोल्डन स्कोअर’ (सडन डेथ) मध्ये बाजी मारत इतिहास घडवला.
Asmita Dey wins GOLD for India! 🇮🇳🥇
A sensational performance from Asmita Dey as she clinches the Women’s 48kg Judo Gold Medal at the Commonwealth Games 2026!
🥇 Women’s 48kg Judo Champion
🇮🇳 India’s 4th Gold Medal at the Commonwealth Games 2026A golden moment for Indian… https://t.co/VmfXthaW2N pic.twitter.com/NFL2U3094X
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 31, 2026
धावपटू ते जुडो चॅम्पियन!
ASMITA CREATES HISTORY WINS GOLD pic.twitter.com/pgPLz6mi71
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 31, 2026
Asmita Dey won the first ever Judo Gold Medal for India at Commonwealth Games! 🔥🥳#CommonwealthGames #AshmitaDey pic.twitter.com/xp6Dii6gPM
— தங்கத்தளபதி✨ (@Thaniraman_) July 31, 2026
त्रिपुरातील बेलोनिया शहरात राहणारी अस्मिता आधी ८०० मीटर धावणारी ॲथलीट होती. मात्र, जिल्हास्तरीय चाचण्यांदरम्यान तिचा कल जुडो कडे वाढला. तिने भोपाळ येथील साई (SAI) सेंटरमध्ये कोच यशपाल सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. सध्या ती केंद्र सरकारच्या ‘टॉप्स’ (TOPS) योजनेचा भाग आहे. अस्मिताच्या या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने चालू राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण १८ पदके (४ सुवर्ण, १० रौप्य आणि ४ कांस्य) जिंकून पदक तालिकेत ९ वे स्थान पटकावले आहे.
दुसरीकडे, पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात भारताच्या हर्ष सिंहने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो कार्लोसचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली असून, त्याच्याकडूनही सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.





