Asian Champions Trophy 2024 : मलेशियाला पराभवाची धूळ चारत टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक…

Asian Champions Trophy 2024 (MAS vs IND) : – राजकुमार पालच्या तीन आणि अरायजीत हुंडलच्या 2 गोलांच्या जोरावर भारतीय संघाने मलेशियाला 8-1 असे पराभूत करताना आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वी भारताने चीन व जपान संघांना पराभूत केले होते.
आज झालेल्या लढतीमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन केले. भारताच्या राजकुमारपालने लढतीतील तिसऱ्याच मिनिटाला गोल केला. यानंतर केवळ तीन मिनिटांच्या अंतराने अरायजीत हुंडलने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलताना भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 7 व्या मिनिटाला भारताच्या जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताची आघाडी 3-0 अशी वाढविली.
Statement victory against Malaysia today here at the Asian Champions Trophy, 2024.
Completely dominating attacking display from the Indian Forward line, midfield and Drag-Flickers.
Hat-trick from Rajkumar Pal, brace from Araijeet Singh Hundal and one goal each from Jugraj… pic.twitter.com/XxEF69Zihn
— Hockey India (@TheHockeyIndia) September 11, 2024
दुसऱ्या सत्रात कर्णधार असलेल्या हरमनप्रीत सिंगने 22 व्या मिनिटाला तर राजकुमार पालने 25 व्या मिनिटाला गोल केला. लढतीच्या 33 व्या मिनिटाला राजकुमार पालने चेंडूवर नियंत्रण मिळवून मैदानी गोल करून भारताची आघाडी 6-0 अशी वाढविली. मलेशियाचा एकमेव गोल अखिमुल्ला अनारने 34 व्या मिनिटाला केला होता. अरायजीत हुंडल 39 व्या मिनिटाला तर उत्तम सिंगने 40 व्या मिनिटाला गोल करून 8-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
या स्पर्धेत भारत आणि मलेशिया संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. मलेशियाविरुद्धच्या सर्व लढती भारताने जिंकल्या आहेत. भारताने स्पर्धेतील सलामीच्या लढतीत चीन संघाला 3-0 असे तर जपान संघाला 5-1 असे पराभूत केले होते. भारताने स्पर्धेत आतापर्यंत 16 गोल केले असून केवळ 2 गोल स्वीकारले आहेत. उद्या भारतासमोर दक्षिण कोरिया संघाचे (1.15 PM) आव्हान असणार आहे.





