Hockey Asia Cup 2025 : भारताची आशिया कपमधील विजयी घोडदौड कायम! मलेशियावर मात करत पूल-ए मध्ये राखले वर्चस्व

Hockey Asia Cup 2025 Updates : बिहारच्या राजगीर येथे सुरू असलेल्या हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पूल-ए मधील सर्व सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने सुपर-4 मध्येही आपला दमदार खेळ कायम ठेवला. भारताने मलेशियाला 4-1 अशा फरकाने पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी दिली नाही. भारताकडून मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, विवेक सागर प्रसाद आणि शैलेंद्र लाकडा यांनी गोल केले, जे या विजयाचे खरे हिरो ठरले.
दुसऱ्या सत्रात भारताचा दमदार खेळ –
पहिल्या सत्रात मलेशियाच्या हॉकी संघाने आपले वर्चस्व राखले. या सत्रात मलेशियाने बराच काळ चेंडूवर नियंत्रण ठेवले आणि शफीक हसन याने गोल करत मलेशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि सातत्याने आक्रमक खेळ केला. भारतीय खेळाडूंनी आक्रमक रणनीती अवलंबत मलेशियाच्या खेळाडूंना संधीच दिली नाही. या सत्रात भारताकडून मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग णि शैलेंद्र लाकडा यांनी गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
विवेक सागर प्रसादचा निर्णायक गोल –
𝟐𝟓𝟎 𝐭𝐢𝐦𝐞𝐬 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐣𝐞𝐫𝐬𝐞𝐲. 𝟐𝟓𝟎 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭𝐬 𝐨𝐟 𝐩𝐫𝐢𝐝𝐞. 🇮🇳
Our captain, Harmanpreet Singh, reaches a memorable milestone!#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/irLafrnKA5
— Hockey India (@TheHockeyIndia) September 4, 2025
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु कोणालाच यश मिळाले नाही. अखेरीस 37व्या मिनिटाला विवेक सागर प्रसाद याने भारतासाठी चौथा गोल केला आणि भारताने 4-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राहिली. त्यानंतर दोन्ही संघांकडील खेळाडूंना गोल करण्यात यश आले नाही.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : ‘अजून बरचं काही साध्य करायचंय…’, सेमीफायनलमधील शतकानंतर ऋतुराज गायकवाडची प्रतिक्रिया
हरमनप्रीत सिंगचा 250वा सामना –
भारतीय संघाचा स्टार खेळाडू हरमनप्रीत सिंग याचा हा 250वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली असून अनेक निर्णायक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 285 गोल केले आहेत.
हेही वाचा – Lalit Modi : ‘त्या दिवशी मी सर्व नियम मोडले…’, IPL च्या पहिल्या सामन्याबद्दल ललित मोदींचा सर्वात मोठा खुलासा
पूल-ए मध्ये भारताचे वर्चस्व –
भारतीय संघाने पूल-ए मधील सर्व तीन सामने जिंकले. यामध्ये भारताने चीन, जपान आणि कझाकस्तान यांना पराभूत केले. सुपर-4 मधील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली होती. भारतीय संघाची ही विजयी मालिका आणि खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ पाहता, हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारताचे पारडे जड मानले जात आहे.





