International Friendly Match 2024 : मलेशियाने भारताला बरोबरीत रोखले, यंदाच्या वर्षात एकाही विजयाची नोंद नाही….

International Friendly Match (India Vs Malaysia) : भारतीय फुटबॉल संघाला सोमवारी हैदराबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात मलेशियाने 1-1 ने बरोबरीत रोखले, त्यामुळे या वर्षी संघाला विजयाचे खाते उघडण्यात अपयश आले. भारताचा हा वर्षातील 11वा सामना होता आणि 2024 मध्ये संघ एकही विजय नोंदवू शकला नाही. या काळात सहा सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले तर पाच सामने अनिर्णित राहिले.
It ends all square in Hyderabad.#INDMAS #IndianFootball ⚽ pic.twitter.com/mHfNxTNTgj
— Indian Football Team (@IndianFootball) November 18, 2024
जागतिक क्रमवारीत 133व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाने सामन्याच्या 19व्या मिनिटाला भारतीय बचावफळीतील विस्कळीतपणाचा फायदा घेत आघाडी घेतली. पाउलो जोस्यूने सामन्यातील पहिला गोल केला. या गोलचे श्रेय जोशुआपेक्षा भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूला जाते, जो गोलपोस्टच्या खूप पुढे गेला होता आणि मलेशियाच्या खेळाडूंना त्याला चकमा देण्यास काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत.
एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर, जागतिक क्रमवारीत 125व्या क्रमांकावर असलेल्या भारताने आपले आक्रमण अधिक तीव्र केले आणि सामन्याच्या 39व्या मिनिटाला राहुल भेकेने हेडरव्दारे गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमणे सुरूच ठेवली, पण मलेशियाची बचावफळी भेदण्यात त्यांना अपयश आले. भारतीय बचावफळीने उत्तरार्धातही उत्तम समन्वय दाखवत मलेशियाला आघाडी घेण्यापासून दूर ठेवले आणि सामना बरोबरीत संपला.
#BiharWACT2024 : उपांत्य फेरीच चित्र झालं स्पष्ट…! जाणून घ्या, भारतासह कोणत्या संघानी मिळवलं स्थान…
सध्याच्या वेळापत्रकानुसार, भारताचा पुढील सामना पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या 2027 आशियाई चषक पात्रता फेरीतील असेल. भारत आणि मलेशिया यांच्यातील हा 33वा सामना होता. या कालावधीत दोन्ही संघांनी 12-12 सामने जिंकले आहेत तर नऊ सामने अनिर्णित राहिले आहेत.


