Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठी खळबळ! निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू; पत्नीही दगावली
Ashok Kharat Case : अशोक खरातचा सहकारी जितेंद्र शेळके यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. खरातच्या ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे वळण घेतले असून त्याचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचाही जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. (Ashok Kharat Case)
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली. (Ashok Kharat Case)
जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. तसेच त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांमध्येही खरातची भागीदारी असल्याची माहिती आहे. खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावात असल्याचेही सांगितले जात आहे. Ashok Kharat Case

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठी खळबळ! निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू; पत्नीही दगावली
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करत, “हा अपघात की घातपात?” असा सवाल केला आहे. वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की जाणूनबुजून छेडछाड करण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. Ashok Kharat Case
तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या घटनेवर संशय व्यक्त करत काही दिवसांपूर्वी चौकशी झाल्यानंतरच हा अपघात घडल्याने शंका अधिक गडद होत असल्याचे म्हटले आहे. (Ashok Kharat Case)
याशिवाय रोहित पवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, “हा अपघात घडवून आणला गेला नाही ना?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे. (Ashok Kharat Case)





