Ajit Pawar Not Reachable | आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये मुक्कामी असताना अचानक कुणालाही न सांगता, पोलिसाचा ताफा न घेता एकटेच निघून गेले. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये बैठका घेत होते. महापालिका निवडणूक जागावाटप आणि तिकिट वाटपावर चर्चा सुरू होत्या. पण आज सकाळी कुणालाही काहीही न सांगता अजित पवार तिथून निघून गेले. नेहमी सोबत असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षक यांचा ताफा हॉस्टेलच्या बाहेरच उभा राहिला अन् अजित पवार मात्र एकटेच निघून गेले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिसकटली पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र, घड्याळ की तुतारी ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती आहेत. शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशाप्रकारे अजित पवार एकटेच गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. Ajit Pawar Not Reachable | अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याने महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या राजकारणात नवे वळण येणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा: Breaking : तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या प्रशांत जगतापांची उमेदवारी अडचणीत ?