DC vs GT : ‘बहुत मारा बे धागा ही खोल दिया…’, जैस्वालने धुलाई केल्यानंतर अर्शदीपने शेअर केला VIDEO

DC vs GT Arshdeep Singh Shares Funny Video with Yashasvi Jaiswal : रविवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जच्या २१९ धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला फक्त २०९ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यातील पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालने अर्शदीप सिंगची चांगली धुलाई करत २२ धावांचा पाऊस पाडला. या सामन्यानंतर अर्शदीप सिंगने यशस्वीसोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.
अर्शदीप सिंगने शेअर केला व्हिडीओ –
आयपीएल २०२५ च्या ५९ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पंजाब किंग्जचा घातक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात २२ धावा काढून केवळ २५ चेंडूत अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत, सामन्यानंतर, अर्शदीप सिंगने त्याच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर यशस्वी जैस्वालसोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी मजेशीर संवाद साधताना दिसत आहेत.
View this post on Instagram
‘बहुत मारा बे धागा ही खोल दिया…’ –
या सामन्यातील चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता ६० धावा देणारा अर्शदीप सिंग खूप चांगल्या मूडमध्ये दिसत होता. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो वेगवान गोलंदाज बॉलिवूड स्टाईलमध्ये म्हणत होता, “बहुत मारा बे धागा ही खोल दिया…”. यावर प्रत्युत्तर देताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, “एकदम…! मैंने बोला था कि इसको एक दिन मारूंगा..।”
हेही वाचा – DC vs GT : ‘…तो पेलूंगा बहुत बता रहा हूँ’, लाईव्ह सामन्यात कुलदीपने पंचांशी घातली हुज्जत, VIDEO व्हायरल
१ स्थानासाठी ३ संघांत स्पर्धा चुरस –
गुजरात-दिल्ली सामन्यानंतर आता आरसीबी, पंजाब आणि गुजरात हे तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता फक्त एकच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो आणि या स्थानासाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे. दिल्ली व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पण यापैकी फक्त एकाच संघाला प्लेऑफचे तिकीट मिळू शकेल. मुंबई सध्या १२ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली १२ सामन्यांत १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि लखनौ ११ सामन्यांत १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे.





