“माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं? सोसायटीत बाजूला एखादा…”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

Bala Nandgaonkar | मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणावरून वाद सध्या वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनतर दादर परिसरातील कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला.
दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मनसेचेन नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, असा थेट सवालच त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर ?
“सुप्रीम कोर्टाकडेही त्यांनी जी याचिका दाखल केली, ती त्यांनी दाखल करुन घेतलेली नाही. कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत. या प्रकरणात काही जैन समाजाने देखील विरोध केला आहे. या प्रकरणात काही जैन समाजाने देखील विरोध केला आहे. माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी माणसं जगली तर कबुतरांना खायला घालतील ना,” असे बाळा नांदगावकर म्हणाले.
“जर कबुतरांमुळे आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. जीवदया आणि भूतदया आम्हालाही करावीशी वाटते. आम्हीही करतो. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण जीवदया भूतदया करत राहायचे.” Bala Nandgaonkar |
“त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीत आपण फ्लॅट घेता, त्या सोसायटीत आपण स्विमिंगपूल, जिम यांसारख्या गोष्टी घेतो. मग त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु केला, तर काय बिघडलं? म्हणजे जवळच्या जवळ तुम्हाला दाणापाणी देता येईल,” असा खोचक टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला. Bala Nandgaonkar |
हस्तक्षेप करण्यास नकार
दरम्यान, कबुतरखान्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा निर्णय देण्यात आला आहे. कबुतरखान्यांवर मुंबई महापालिकेने आणि मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडून देखील कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. Bala Nandgaonkar |
हेही वाचा :




