Omraje Nimbalkar | मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना पावसाचा फटका बसला असून अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. याशिवाय धाराशिवाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांची मदत करत आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून, मनसेकडून देखील ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. सध्याच्या राजकारणातील कोहिनूर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सध्याच्या राजकारणातील कोहिनूर म्हणत ओमराजे निंबाळकरांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात नांदगावकर यांनी लिहिले की, ‘नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खुप चांगल्या भावना नाही. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण.अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले. त्यामुळेच सुमारे 3.30 लाख मतांनी निवडून आले. ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे. तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे.’ Omraje Nimbalkar | नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी… ‘सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड वर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे. या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओम कडे बघावे आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम तु लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहे ते उत्कृष्ट असेच आहे पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे. राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खुप अभिमान आहे,’ असे बाळा नांदगावकर यांनी ओमराजे यांचे भरभरून कौतुक केले आहे. Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत एनडीआरएफ टीमचेही आभार मानले. धाराशिव जिल्ह्याच्या वडनेर ता. परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एका आजीसह 2 वर्षाचा मुलगा आणि 2 व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते. सोबतच स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने ते अडकले होते. परिणामी NDRFच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी 8 वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले. या कार्यात NDRFच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!, असे ओमराजे निंबाळकर यांनी पोस्टमध्ये म्हंटले. Omraje Nimbalkar | हेही वाचा: