Savitribai Phule Pune University : आक्रमक पवित्र्यानंतर ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ वक्तृत्व स्पर्धा रद्द; रोहित पवारांनी दिला थेट इशारा म्हणाले आता…

Savitribai Phule Pune University : NSUI आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘Voice of Devendra’ असा वादग्रस्त विषय असलेली वक्तृत्व स्पर्धा रद्द केली आहे. यासंबंधीचे एक परिपत्रक विद्यापीठाने जारी केलं आहे. मात्र, असा विषय घेतलाच का? याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनेच्या आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून पुणे विद्यापीठाने ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने म्हटले होते. ही स्पर्धा महाराष्ट्रातील 14 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींसाठी खुली होती. स्पर्धेचा मुख्य विषय ‘विकसित महाराष्ट्र’ हा आहे. पण या स्पर्धेला विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
विद्यापीठात विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी संघटनांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत थेट इशारा दिला आहे.
‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली. पण ‘एकीकडं व्हाइस ऑफ देवेंद्र’ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं… pic.twitter.com/CCBiomiLAQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 12, 2025
रोहित पवार यांच ट्वीट
‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली. पण ‘एकीकडं व्हाइस ऑफ देवेंद्र’ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं, हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीने आपला राजकीय अजेंडा राबवणं, योग्य नाही. शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत, महिन्याअखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू..! असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा : ‘जॉली Vs जॉली! ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाचा मजेशीर टीझर रिलीज





