Arbaaz Khan Wedding : सलमान खानचा धाकटा भाऊ आणि मलायका अरोराचा माजी पती अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या अभिनेत्याच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने मीडियात येत आहेत. एका इंग्रजी मीडियाने दिलेल्या बातमीनुसार अरबाज आज (दि २४) पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. 24 डिसेंबरच्या दुपारी, अभिनेता त्याची बहीण अर्पिता खानच्या घराबाहेर दिसला.
View this post on Instagram
अभिनेता अरबाज खान मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत बहिणीच्या घरी लग्न करणार असल्याचे समजते. अरबाज बहिण अर्पिता खानच्या घराबाहेर स्पॉट झाला होता. अरबाज शौरा हे कपल अर्पिता खानच्या घरी लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.आता त्याचा मुलगा अरहान खानही अर्पिता खानच्या घरी पोहोचला आहे. संपूर्ण खान कुटुंब या ठिकाणी घरात सामील होत आहे.
आई सलमा आणि वडील सलीम यांच्यासह इतर कुटुंबीय देखील आले
अरबाज खानचे आई-वडीलही अर्पिता खानच्या घरी पोहोचले आहेत. या खास प्रसंगी सलीम खान अगदी सिंपल लूकमध्ये दिसले तर आई सलमा रंगीत सूटमध्ये दिसली.या लग्नात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड युलिया वंतूर देखील सहभागी होणार आहे. यावेळी अभिनेत्री काळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली.
View this post on Instagram
बहिण अलविरा खान अग्निहोत्रीने पती अतुल अग्निहोत्रीसोबत भावाच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी अलविरा खान अनाकरकली सूटमध्ये तर अतुल पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसला.
वयाच्या ५६ व्या वर्षी दुसरे लग्न
एका इंग्रजी मीडियाच्या रिपोर्टनुसार, अरबाज आणि शौरा या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला फक्त कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत.