पिंपरी, (प्रतिनिधी) – अभिषेक विद्यालयम् शाहूनगर येथे ॲडमायरेशन डे (प्रशंसा दिवस )आयोजित करण्यात आला .यामध्ये शैक्षणिक वर्षात झालेल्या सर्व प्रकारच्या स्पर्धा तसेच मागील शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक रँकर्स या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदके, पारितोषिकांचे वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले. विविध कार्यक्रमांनी प्रशंसा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मुलांचे कौतुक करून त्यांना पारितोषिके देण्यास शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका गीता चरंतीमठ , सचिव मनीषा कसबे व सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.