‘अनेक कलाकारमध्येच सोडून गेले’; अपूर्वा नेमळेकरचा तेजश्री प्रधानला खोचक टोला?

Apurva Nemlekar | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या शुटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता अपूर्वी नेमळेकरने देखील भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या तिने सावनी हे खलनायिकेचं पात्र साकारले होते.
अपूर्वाने मालिका संपताना शूटिंगच्या आठवणी, सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. सोबतचे तिने लिहिले की, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शुटिंग पूर्ण झालय. माझ्या मनात खूप भावना दाटून आल्यात. जवळपास 2 वर्षांचा आमचा प्रवास होता. अनेक गोष्टी या काळात शिकायला मिळाल्या. शेवंतापासून ते सावनीपर्यंतचा माझा प्रवास खूप काही शिकवून गेला. मी यावेळी जाणिवपूर्वक खलनायिकेची म्हणजेच सावनीची भूमिका साकारली होती. मी त्या पात्राला पडद्यावर जिवंत सुद्धा केलं. मला सर्वोकृष्ट खलनायिकेचा पुरस्कारही मिळाला.’
View this post on Instagram
‘मी सपूर्ण टीमचं आभार मानते. निरोप घेणं सोप नाही. पण या काळात बरंच काही शिकायला मिळालं. अनेक कलाकार मध्येच सोडून गेले. तेव्हा खरी परिक्षा होती. परंतु आम्ही खचलो नाही. आम्ही तेवढाच उत्साह, धमाल कलाकार सोडून गेल्यानंतरही केली. या सगळ्या गोष्टींमुळे कोणतीच कमी भासणार नाही याची आम्ही काळजी घेतली.’ दरम्यान, या पोस्टमध्ये अपूर्वाने नाव न घेता तेजश्री प्रधान ला टोला लगावला असल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, अपूर्वा लवकरच ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते देखील तिच्या आगामी भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा :




