तेजश्री प्रधानने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाली, ‘…त्यामुळेच कठीण निर्णय घेण्याचं बळ येतं’

Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अलीकडेच तिच्या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे. तिच्या मालिकेचे नाव ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे आहे. यात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. नुकतेकज तेजश्रीने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
एक अनोखी प्रेमकथा असलेल्या या मालिकेचा प्रोमो २४ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या ४ दिवसात या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ४ दिवसात २० लाख लोकांनी हा प्रोमो पाहिला. त्यामुळे नव्या मालिकेसाठी प्रेक्षकांचं प्रेम पाहून तेजश्री भारावून गेली आहे. त्याबाबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
तेजश्री प्रधानची पोस्ट
तेजश्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने प्रोमोचा स्क्रिनशॉट स्टोरीला शेअर करत लिहिले की, ‘My Constant माझी माणसं…मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप आभार…तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, विश्वास पाहून माझं मन नेहमीच आनंदाने भरून जातं. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा जाणीव होते तुम्ही माझ्यावर दाखवत असलेल्या विश्वासाची, त्यामुळेच कधीतरी कठीण निर्णय घेण्याचं बळ येतं. Never Settle For Less असं म्हणण्याचं देखील बळ मिळालं. उत्तम कामाचा प्रयत्न राहील. प्रोमोला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते.’ Tejashree Pradhan |
दरम्यान, तेजश्री ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत दिसली. तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून तिने अचानक एक्झिट घेतली. त्यानंतर ती नव्या मालिकेतून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता प्रेक्षक ह्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. Tejashree Pradhan |
हेही वाचा:





